शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ७/१२ वरील नाव दुरुस्ती किंवा क्षेत्र दुरुस्ती करायची असल्यास काय कराल ? कुठं अर्ज करणार ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : शेतकरी बांधवांसाठी सातबारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, नुकसान भरपाई साठी, शासकीय मदतीसाठी, अनुदानासाठी तसेच जमिनीच्या खरेदी आणि विक्रीसाठी लागतो. सातबारा उताऱ्यावर जमिनीची ईत्यंभूत माहिती प्रविष्ट असते.

जमीन कोणाच्या मालकीची आहे, जमिनीवरील बोजा, किती जमीन आहे यासारखी सर्व आवश्यक माहिती सातबाऱ्यावर असते. यामुळे सातबारा उतारा जमिनीच्या खरेदी आणि विक्रीसाठी आवश्यक असतो. या कागदपत्राच्या आधारावरच जमिनीच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया होते आणि दस्त नोंदणीसाठी हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा खूपच महत्त्वाचा ठरत असतो. मात्र काही शेतकऱ्यांच्या या सातबारा उताऱ्यावर काही चुका झालेल्या असतात. यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात देखील अडचणी निर्माण होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून सातबारा उताऱ्यावर झालेली चुकीची दुरुस्ती कशी केली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावर झालेली नावाची आणि क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विचारपूस केली जात होती. दरम्यान आज आपण सातबारावरील नाव दुरुस्ती किंवा क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे यासाठी कुठे अर्ज केला पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

7/12 वरील नाव दुरुस्ती किंवा क्षेत्र दुरुस्ती करता येईल का?

महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 मध्ये याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. या महसूल जमीन अधिनियमाच्या कलम 155 नुसार सातबारावरील नाव दुरुस्ती, क्षेत्र दुरुस्ती तसेच एखाद्याचे नाव लावायचे असेल किंवा नाव कमी करायचे असेल तर शेतकऱ्यांना यासाठी अर्ज सादर करावा लागतो. अर्थातच सातबारा वरील नाव दुरुस्ती, क्षेत्र दुरुस्ती तसेच एखाद्याचे नाव लावणे किंवा कमी करायचे असेल तर शेतकरी हे काम करू शकतात.

कुठं करणार अर्ज?

याबाबत महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 च्या कलम 155 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार सातबारा वरील दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर तहसीलदाराच्या माध्यमातून सातबारावर झालेल्या चुकीची दुरुस्ती केली जाते.