LPG Gas Cylinder : घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे. सरकारने पीएम उज्वला योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्यानंतर घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अगदी खेड्यापाड्यात देखील आता एलपीजी गॅस चा वापर वाढला आहे. यामुळे महिलांना चुलीच्या धुरापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे.
मात्र, केवायसी कडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. अजूनही अनेक ग्राहकांनी केवायसी केली नसल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र घरगुती गॅस ग्राहकांना नजिकच्या भविष्यात मोठा फटका बसणार आहे. जर घरगुती गॅस ग्राहकांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे कनेक्शन रद्द केले जाणार असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे अशा ग्राहकांची सबसिडी देखील बंद केली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्राहकाने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन वितरकांच्या माध्यमातून केले जात आहे. गोंदिया शहर आणि परिसरात केवायसी करण्यासाठी ग्राहकांना 31 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान या मुदतीत सर्वच ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन वितरकांनी केले आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी ३०० रुपयाची सबसिडी देखील बंद केली जाणार आहे.
विशेष म्हणजे जे ग्राहक केवायसी करणार नाहीत त्यांचे कनेक्शन रद्द होणार आहे. म्हणजेच केवायसी न केलेल्या ग्राहकांना भविष्यात गॅस मिळणार नाही. यामुळे जर तुम्हीही अद्याप केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
केवायसी करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या गॅस वितरक कंपनीकडे जायचे आहे. गॅस एजन्सी मध्ये भेट देऊन ग्राहक आपले आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा थम्ब इत्यादी माध्यमातून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.