LPG Gas Cylinder Price : आज 31 मार्च 2024 अर्थातच चालू आर्थिक वर्षाचा म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 चा आजचा शेवटचा दिवस. आज मार्च एंडिंग आहे अन उद्यापासून आर्थिक वर्ष 2024-25 ला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्यांसाठी एक मोठी भेट मिळणार आहे.
ती म्हणजे आता सर्वसामान्य कुटुंबांना स्वस्तात गॅस सिलेंडर खरेदी करता येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांना गॅस सिलेंडरवर तब्बल तीनशे रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे. सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पीएम उज्वला योजनेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना घरगुती गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी दिली जात आहे. ही सबसिडीची योजना आज अर्थातच 31 मार्च 2024 ला संपणार होती.
परंतु ही योजना संपण्याआधीच आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने या योजनेला एका वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यानुसार आता आर्थिक वर्ष 2024-25 अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडीचा लाभ मिळत राहणार आहे.
म्हणजेच आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या तीनशे रुपयांच्या सबसिडीचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत मिळत राहणार आहे.
खरंतर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आला. ऑक्टोबर 2023 मध्ये उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या रकमेत शंभर रुपयांची वाढ करून ही रक्कम तीनशे रुपये करण्यात आली.
याआधी ही रक्कम दोनशे रुपये एवढी होती. दरम्यान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या म्हणजेच 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या सबसिडी मध्ये शंभर रुपयांची वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने पीएम उज्वला योजनेला एका वर्षाची मुदत वाढ दिली आहे.
हा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी असे म्हटले होते की, आता पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी सबसिडी 2024-25 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे देशातील सुमारे 10 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. तसेच यामुळे सरकारवर 12,000 कोटी रुपये खर्च होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.