LPG Gas Cylinder Price Decrease : आगामी वर्षात अर्थातच सन 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे संकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. याशिवाय देशभरातील विविध राज्यांमध्ये पुढल्या वर्षी विधानसभा निवडणूका देखील रंगणार आहेत.
यामुळे आतापासूनच निवडणुकीचे पडघम संपूर्ण देशभर वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने उज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या.
आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडर केंद्रातील मोदी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज अर्थातच बुधवार तारीख 4 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्रातील मोदी सरकारने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता दोनशे रुपयांऐवजी प्रति सिलेंडर 300 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे.
ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे नुकत्याच काही दिवसांपूर्वी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आता पुन्हा एकदा उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने आज उज्ज्वला लाभार्थीसाठी सिलेंडरच्या अनुदानात 100 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडरवर सबसिडी म्हणून 300 रुपये दिले जाणार आहेत.
किती रुपयांना मिळणार आता गॅस
खरंतर रक्षाबंधन अपूर्वी गॅसच्या किमती या 1100 रुपये प्रति सिलेंडर एवढ्या होत्या. मात्र शासनाने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यामध्ये दोनशे रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार उज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर फक्त 700 रुपयांना मिळू लागला.
सबसिडीचे दोनशे रुपये आणि सिलेंडरच्या दरात झालेल्या दोनशे रुपयांची कपात यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सातशे रुपयात गॅस सिलेंडर मिळत होते. दरम्यान आज सबसिडीत 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे यामुळे आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर फक्त 600 रुपयात मिळणार आहे.