LPG Cylinder Price : गेल्या काही वर्षांमध्ये महागाईचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडरच्या किमती देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत.
अशातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर 14 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 950 रुपयांच्या आसपास आहे. यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर वापरणे देखील परवडत नाहीये.
आता मात्र यावर उपाय म्हणून एक नवीन सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे. हे नवीन सिलेंडर इंडेन या पेट्रोलियम कंपनीने बाजारात लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे याची किंमत 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरपेक्षा 300 रुपयांनी कमी आहे.
यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट सुरळीत राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडेन कंपनीने नवीन कंपोझिट सिलेंडर बाजारात आणले आहे.
हे सिलेंडर फक्त आणि फक्त 634 रुपयांना राजधानी मुंबईत उपलब्ध होते. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात गॅस सिलेंडर मिळणार आहे. मात्र हे कंपोझिट सिलेंडर फक्त दहा किलो वजनाचे आहे.
सध्या बाजारात केवळ इंडेन कंपनीच्या माध्यमातून हा कंपोझिट सिलेंडर पुरवला जात आहे. या सिलेंडरची सर्वात खास आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की, हे सिलेंडर पूर्णपणे पारदर्शी आहे. शिवाय उचलायला देखील हलके आहे.
परंतु हे कंपोझिट सिलेंडर कंपनीच्या माध्यमातून काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र आगामी काही महिन्यांमध्ये हे सिलेंडर देशातील इतरही महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरात हे कंपोझिट सिलेंडर ग्राहकांना मिळू शकणार आहे. आता आपण या कंपोझिट सिलेंडरच्या शहरानुसार असणाऱ्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपोझिट सिलेंडरच्या किंमती
दहा किलो वजनी कंपोझिट सिलेंडरची किंमत राजधानी मुंबईमध्ये 634 एवढी आहे. राजस्थानमधल्या जयपूर मध्ये 636.50 रुपयांना हे सिलेंडर उपलब्ध होते. याशिवाय पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे या कंपोझिट सिलेंडरची किंमत ६५२ रुपये एवढी आहे.
दुसरीकडे या सिलेंडरची किंमत चेन्नईमध्ये ६४५ रुपये, लखनौमध्ये ६६० रुपये, इंदूरमध्ये ६५३ रुपये, भोपाळमध्ये ६३८ रुपये, गोरखपूरमध्ये ६७७ रुपये एवढी आहे. निश्चितच या कंपोझिट सिलेंडरमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. उचलायला हलका आणि पारदर्शी असल्याने याचा ग्राहकांना फायदा होईल अशी आशा कंपनीला आहे.