LPG ग्राहकांना ‘अस’ झाल्यास मिळतात 6 लाख रुपये ! सरकारने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder : गेल्या काही वर्षांपासून भारतात एलपीजी सिलेंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.

आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. एवढेच नाही तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात देखील 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर साठी फक्त दोनशे रुपयांचे अनुदान मिळत होते. आता मात्र हे अनुदान तीनशे रुपये एवढे करून देण्यात आले आहे. परिणामी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर स्वस्तात उपलब्ध होत आहे.

राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडर सर्वसामान्यांना 903 रुपयात उपलब्ध होत आहे. मात्र उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त 603 रुपये हात मिळत आहे. अर्थातच, तीनशे रुपयांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

याशिवाय, एलपीजी ग्राहकांना जर LPG चा स्फोट झाला तर नुकसान भरपाई देखील दिली जात आहे. याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

एलपीजीचा स्फोट झाल्यास मिळते एवढी नुकसान भरपाई

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरचा अपघात झाल्यास, स्फोट झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. ही भरपाई तेल विपणन कंपन्या (OMCs) देतात.

त्यांनी सांगितले की, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) मध्ये नोंदणीकृत सर्व LPG ग्राहकांना विमा संरक्षण आहे. एलपीजी सिलिंडरला आग लागली, स्फोट झाला आणि या अपघातात जीवितहानी झाली, कोणाचा मृत्यू झाला तर प्रति व्यक्ती ६ लाख रुपये एवढे वैयक्तिक अपघात संरक्षण मिळत आहे.

प्रति अपघात घटना 30 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च दिला जातो, यात कमाल 2 लाख रुपये प्रति व्यक्ती एवढा वैद्यकीय खर्च कव्हर केला जात आहे.

त्याचप्रमाणे, मालमत्तेचे नुकसान झाल्यास, ते प्रति घटनेसाठी कमाल 2 लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करत आहे. ग्राहकाच्या आवारात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडल्यास ग्राहकाने संबंधित तेल विपणन कंपनीच्या वितरकाला कळवावे.

वितरकाकडून माहिती मिळाल्यानंतर तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देते. मग संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदींनुसार दाव्याच्या निकालाबाबत पुढील निर्णय घेत असते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा