Love Marriage Document List : कोणत्याही संस्कृतीत काळानुरूप बदल होतो. भारतीय संस्कृती देखील या गोष्टीला अपवाद ठरलेली नाही. भारतीय संस्कृतीत काळानुरूप अनेक बदल झाले आहेत. भविष्यातही शेकडो बद्दल आपल्या संस्कृतीत होणार आहेत. या ग्लोबलायझेशनच्या अर्थातच जागतिकीकरणाच्या युगात हे बदल होणे स्वाभाविकच आहे.
याच बदलाचा परिणाम म्हणून सध्या संपूर्ण देशात लव मॅरेज करण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. खरंतर पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत लव मॅरेजला मोठा विरोध केला जात असे. आजही ग्रामीण भागात लव मॅरेज म्हटलं की अशा व्यक्तीचा विरोधच केला जातो. मात्र आता परिस्थिती पूर्वीपेक्षा फार बदलली आहे. शहरात तर लव मॅरेजचा कुठेच विरोध होत नाही मात्र आता ग्रामीण भागात देखील लव मॅरेजसाठी विरोध होताना पाहायला मिळत नाहीये.
विशेष म्हणजे इंटरकास्ट मॅरेजला प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडूनही वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. हेच कारण आहे की, आता लव्ह मॅरेज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आधी तरुण-तरुणी प्रेमसंबंध प्रस्थापित करतात आणि त्यानंतर मग लग्न बंधनात अडकतात. दरम्यान लव्ह मॅरेज करणारे तरुण-तरुणी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात किंवा मग सहमतीने लग्न करतात मात्र लव मॅरेज करणारे तरुण-तरुणी रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊनच लग्न करण्यास पसंती दाखवतात.
मात्र अनेकांना लव मॅरेज करायचे असते पण रजिस्टर ऑफिस मध्ये लव्ह मॅरेज करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याबाबत त्यांना माहिती नसते. अशा परिस्थितीत आज आपण लव्ह मॅरेज करण्यासाठी किंवा रजिस्टर ऑफिस मध्ये लग्न करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लव मॅरेज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
- सर्वप्रथम लव मॅरेज करणाऱ्या मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मुलाचे आणि मुलीचे आधार कार्ड
- मुलाचे आणि मुलीचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला.
- मुलाचे आणि मुलीचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- मुलाचे आणि मुलीच्या वयाच्या पुराव्यासाठी शाळेचे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट
- रहिवाशाचा पुरावा म्हणून मुलाचे आणि मुलीचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी कार्ड
- यासोबतच मुलाचे आणि मुलीचे दोन-दोन विटनेस त्यांचे आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात.