Ladyfinger Varieties : भेंडी हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. याची लागवड भारतातील विविध राज्यांमध्ये केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील भेंडीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
हे प्रमुख भाजीपाला पीक शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. या पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. परंतु या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित जातींची शेती करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत आज आपण भेंडीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या भेंडीचे टॉप पाच वाण कोणते आहेत आणि त्यांच्या विशेषता काय आहेत.
भेंडीचे टॉप पाच वाण कोणते?
पुसा सावनी : भेंडीला बाजारात बारा महिने मागणी असते. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. पुसा सावनी ही भेंडीची एक सुधारित जात आहे. या जातीची देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड पाहायला मिळते.
शेतकऱ्यांमध्ये भेंडीची ही जात अधिक लोकप्रिय आहे. या जातीचे पीक मात्र 60 ते 65 दिवसांत तयार होत आहे. म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या काळात या जातीच्या पिकातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड कोणत्याही हंगामात करता येऊ शकते.
परभणी क्रांती : महाराष्ट्रात उत्पादित होणारी भेंडीची सुधारित जात म्हणून परभणी क्रांती ओळखली जाते. या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
या जातीची विशेषता म्हणजे पीक लागवडीनंतर अवघ्या 50 दिवसांच्या काळात फळधारणा होते. महाराष्ट्रातील हवामानात या जातीचे पीक चांगले वाढते आणि यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
अर्का अनामिका : भेंडीचा हा एक सुधारित प्रकार आहे. या जातीच्या भेंडीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीची उन्हाळा आणि पावसाळा या दोन हंगामात लागवड केली जाऊ शकते.
पंजाब पद्मिनी : या जातीची लागवड पंजाब राज्यात प्रामुख्याने केली जाते. पंजाब विद्यापीठाने विकसित केलेली ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
अर्का अभय : कमी दिवसात तयार होणारे भेंडीचे हे एक सुधारित वाण आहे. या जातीची विविध राज्यांमध्ये लागवड पाहायला मिळते. या जातीच्या भेंडी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते.