Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचा लाभ देखील देण्यात आला आहे.
म्हणजेच या योजनेचे एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा 6 वा हफ्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.
आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याबाबत एक नवीन माहिती हाती आली आहे.
केव्हा मिळणार डिसेंबर महिन्याचे पैसे ?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा डिसेंबर हप्त्याचा पैसा पात्र महिलांच्या खात्यात आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच जमा केला जाईल अशी ग्वाही दिली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 23 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत.
नोव्हेंबर अखेरपर्यंत या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नोव्हेंबर महिन्याचे पैसे शिंदे फडणवीस पवार सरकारने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच ऍडव्हान्स मध्ये जमा केलेत.
म्हणून डिसेंबर महिन्याचे पैसे पण ॲडव्हान्स मध्ये जमा होणार का असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असेच संकेत दिले आहेत.
शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर मध्ये खात्यात जमा होणार असे म्हटले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक इथं महायुतीचे उमेदवार आशिष जैयस्वाल यांच्या प्रचारादरम्यान याबाबत मोठी घोषणा केली.
आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं त्यांनी म्हटलंय. अर्थातच जर निवडणुकीच्या निकालात महायुतीचे सरकार आले तर लगेचच लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आली आहे.