Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत फारच गेम चेंजर ठरली. लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. मात्र सत्ता स्थापित झाल्यापासून लाडकी बहीण योजने संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या योजनेच्या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार हा प्रश्न महिलांकडून उपस्थित होतोय. दरम्यान आता याच संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे.
राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा म्हणजे सहावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो याबाबत मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणालेत मुनगंटीवार
भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मी अजितदादांशी चर्चा केली आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसांत महिलांना हफ्ता देऊ असे ते म्हणाले आहेत. ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वसत करू इच्छतो की त्यांना पैसे पोहोचतील.
लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होईल.’ एकंदरीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या दोन दिवसांनी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार असे म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळतोय.
या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले असून आता डिसेंबर महिन्याचा पैसा देखील येत्या दोन-तीन दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नक्कीच 2024 या वर्षाचा शेवट गोड होणार असून लाडक्या बहिणींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मात्र महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे सरकार पुन्हा आले तर आम्ही 2100 रुपयांचा हप्ता देऊ असे आश्वासन दिले आहे.
यामुळे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपये केव्हापासून मिळणार हा सवाल सातत्याने उपस्थित होतोय. यासंदर्भात राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याबाबत विचार होईल अशी भूमिका मांडली आहे.