Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. अर्थातच पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे.
या अंतर्गत आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यात 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार आहे.
शिंदे सरकारने जाहीर केलेली ही एक महत्त्वाकांशी योजना असून याच योजने संदर्भात आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. खरे तर सध्या सोशल मीडियामध्ये लाडक्या बहिणींना सरकार फ्री मोबाईल देणार अशा आशयाचे पोस्ट व्हायरल होत आहेत.
मात्र या पोस्ट मागे काय सत्यता आहे, खरंच पात्र महिलांना फ्री मोबाईल मिळणार आहेत का? या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे सत्यता?
खरे तर सध्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना सरकारकडून फ्री मोबाईल मिळणार असे व्हिडिओज youtube सह सर्वचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे यासाठी महिलांना अर्ज सादर करावा लागणार असेही या व्हिडिओज मध्ये म्हटले गेले आहे. यामुळे या योजनेसंदर्भात राज्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
मात्र सरकार लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अशा पोस्ट पासून आणि व्हिडिओ पासून सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींना सरकार मोबाईल गिफ्ट देणार अशा आशयाचे पोस्ट सध्या सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र याच्या माध्यमातून महिलांचे फसवणूक होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण की अशा प्रकारचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
या संदर्भात कोणताच शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे महिलांनी या अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये अन्यथा त्यांची फसवणूक होऊ शकते असे आवाहन जाणकारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.