Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. दरम्यान, याच योजनेसंदर्भात आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार? या संदर्भात नवीन अपडेट दिली आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून सुरू आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
या चालू नोव्हेंबर महिन्याचे पैसे तर पात्र ठरणाऱ्या महिलांना ऍडव्हान्स मध्येच देण्यात आले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळणार का असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला होता.
दरम्यान आता याच प्रश्नाचे उत्तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार?
पुढील हप्त्याचे पैसे ॲडव्हान्स मध्येच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार का याबाबत नवीन अपडेट दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिलेत. आता राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान आहे अन 23 नोव्हेंबरला निकाल आहे.
तसेच, डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदें यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही घेणाऱ्यांमधील नव्हे तर, देणाऱ्यांधील असल्याचा टोलादेखील शिंदेंनी विरोधकांना लगावलाय. आतापर्यंत 2 लाख 20 हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.