krushimarathi :’राज्य शासन कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.तर त्यामुळे मराठवाड्यातील लोकांचा पाणी प्रश्न हा मिटणार आहे.
सध्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गत मराठवाड्याला पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याबाबत माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की,
मराठवाडा प्रकल्पासाठी सध्या 7 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.मात्र ह्या प्रकल्पासाठी 23 टीएमसी पाण्याची आवश्यकता असून उर्वरित 16.66 टीएमसी पाणी हे कृष्णा खोरे तुन मराठवाड्याला देण्याबाबत
सरकार दरबारी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले.
तर दर वर्षी टाटाच्या जलविद्युत प्रकल्प अंतर्गत वीज निर्मिती केल्यानंतर 42.50 टीएमसी पाणी कोकणात सोडले जाते.हेच पाणी टप्प्याटप्प्याने भीमा खोऱ्यात उपलब्ध करून मराठवाड्याला कसे देता येईल यासाठी
राज्य सरकारने सुर्वे समिती गठन केली आहे.जर समितीचा अहवाल सकारात्मक आला तर निश्चितच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटणार आहे.