महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एप्रिल आणि मे महिन्यात गरमी जास्त राहील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता
मात्र दिनांक ७ एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट बुकिंग बाबत मोठी माहिती ! पहा डिटेल्स
5 एप्रिल रोजी जिल्ह्यांना यलो अलर्ट : हवामान विभागाकडून ७ एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर ५ एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे,
६ आणि ७ एप्रिल रोजी ह्या जिल्ह्यांना यलो अलर्ट : तर ६ आणि ७ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, ‘ परभणी, ‘ नांदेड, हिंगोलीचा समावेश आहे. यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली
उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर हवामानातील बदलामुळे जिथे लोकांना ज्या ठिकाणी उष्णतेचा सामना करावा लागला नाही त्या ठिकाणी मात्र अतिवृष्टीसह झालेल्या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
भारतात कोणत्या राज्यात काय होणार ?
दिल्लीतील काही भागात आज संध्याकाळीही हलक्या सरीचा पाऊस झाला. आजच्या दिवसाबरोबरच हवामान खात्यानेही 4 एप्रिल रोजीही दिल्लीसह काही भागात हलक्या सरीचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा :- मच्छिंद्रभाऊ मानलं! कांद्याच्या आगारात फुलवली केळीची शेती, झाली लाखोंची कमाई बनले लखपती
हिमाचल प्रदेशातील काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीसह आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 तारखेनंतर पावसाचे प्रमाण कमी होणार असले तरी त्यानंतरही काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये 4 एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दिल्लीसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 5 दिवसांत काही भागात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाविषयी आयएमडीकडून सांगण्यात आले आहे की, एप्रिल ते जून या काळात भारतातील काही भाग वगळता बहुतांश भागात तापमान अधिक उष्ण राहणार आहे.