Kapus Bajarbhav : कापूस दर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेजीत आले होते, मात्र काल परवापासून पुन्हा एकदा कापूस दरात घसरण होत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढत आहे.
खरं पाहता यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला व्यापाऱ्यांनी विक्रमी दर दिला मात्र त्याच्यानंतर कापूस दरात घसरण झाली. कापसाला मात्र सात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. नोव्हेंबर महिन्यात मात्र कापसाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. कापूस साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमाल बाजार भावात विक्री होऊ लागला.
आता पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झाले असून कापूस बाजार भाव नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आत आले आहेत. आज देखील कापूस दर 9000 च्या आतच पाहायला मिळालेत. चला तर मग जाणून घेऊया राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस दर.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज दोन हजार क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा किमान, कमाल आणि सरासरी दर मिळाला.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज साडेचारशे क्विंटल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 8800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एच 4 मध्यम स्टेपल कापसाची १४० क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8800 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8700 मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 304 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8640 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8740 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8700 नमूद करण्यात आला आहे.