Kapus Bajarbhav Update : कापसाला आपल्याकडे पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. शाश्वत उत्पन्न आणि अधिक दर यामुळे कापसाची शेती अलीकडे वाढली आहे. मात्र बाजार भावाबाबत कायमच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांकडे कमी कापूस शिल्लक होता.
कमी दर असतांना अधिक कापूस विक्री झाल्याने गत हंगामात शेतकऱ्यांना कापसाने संधी साधू दिली नाही. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामात कापूस लागवड शेतकऱ्यांनी वाढवली जेणेकरून चांगला दर मिळेल आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना निराशाचाच सामना करावा लागला आहे. खरं पाहता शेतकऱ्यांचा कापूस मार्केटमध्ये दाखल होण्याअगोदर कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र शेतकऱ्यांचा कापूस मार्केटमध्ये आला आणि दरात मोठी घसरण झाली. डिसेंबर महिन्यात मात्र साडेसात हजार रुपयांचा भाव कापसाला मिळत होता.
जानेवारीमध्ये थोडीशी परिस्थिती बदलली. कापसाचे दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भाव पातळीवर आलेत. कमाल बाजार भावाने अकोट सारख्या एपीएमसी मध्ये 9 हजार रुपयांचा टप्पा गाठला. मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकू शकली नाही. आता गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात मोठी घसरण होत आहे.
विशेषता कापूस नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात कापूस दरातील घसरण शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवत आहे. काल आणि परवा झालेल्या लिलावात जळगाव जिल्ह्यातील यावल एपीएमसी मध्ये कापसाला मात्र 7500 रुपये प्रति क्विंटल चे आसपास दर मिळाला आहे.
या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की कमाल बाजार भाव आणि सरासरी बाजार भाव यामध्ये मोठी तफावत या मार्केटमध्ये पाहायला मिळाली नाही.निश्चितच साडेसात हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाहीये. राज्यातील इतर बाजारात मात्र कापूस आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री झाला आहे.
दरम्यान आता दरवाढीसाठी पोषक परिस्थिती बनत असल्याचा तज्ञांचा दावा आहे. चीनकडून वाढती मागणी लक्षात घेता आणि अमेरिकन कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने कापूस दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे काही तज्ञांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान अमेरिकन कृषी विभागाने एक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारां देखील अंदाज वर्तवला आहे. युएस कृषी विभागाच्या मते उत्पादनात घट झाली आहे मात्र कापसाचा वापरही गेल्या हंगामाच्या तुलनेत घटणार आहे. अशा परिस्थितीत वापर कमी झाला तर याचा दरावर दबाव राहणार आहे.
मात्र काही तज्ञांनी यावर आक्षेप नोंदवत चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने त्या ठिकाणी वापर वाढेल तसेच इतरही देशात कापूस वापर वाढण्याचा अंदाज वर्तवत दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे स्पष्ट केले आहे. जाणकार लोकांनी या हंगामात कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.