Kapus Bajarbhav Update : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील खानदेश मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र तूर्तास कापसाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी होत आहे. परंतु जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जाणकार लोकांच्या मते कापसाच्या भावात यावर्षी तेजीचं राहणार आहे. सध्या स्थितीला कापसाला आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर महाराष्ट्रात नमूद केला जात आहे.
मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पॅनिक सेलिंग टाळावी आणि गरजेपुरताच कापूस यावेळी विक्री करावा असा सल्ला देत जानकारं लोकांनी यावर्षी कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळेल अशी भविष्यवाणी केली आहे. जाणकार लोकांच्या मते जानेवारीअखेर सध्या तयार झालेली परिस्थिती बदलेल पुन्हा एकदा कापूस दरात तेजी येईल.
निश्चितच शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीला गरजेपुरता कापूस विक्रीस प्राधान्य दिले पाहिजे आणि जेव्हा कापसाला समाधानकारक असा दर मिळेल त्यावेळी कापूस विक्री केली पाहिजे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5000 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 250 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8190 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1788 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 900 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 469 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8275 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.