शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘पांढर सोनं’ 100 रुपयांनी कडाडलं, आणखी एका महिन्यात कापसाचे भाव ‘एवढे’ वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Bajarbhav : कापूस हे महाराष्ट्रासहित कर्नाटक, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. कापसाला राज्यातील शेतकरी पांढरं सोनं म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे कापसाला नेहमीच चांगला भाव मिळतो.

पण गेल्या हंगामापासून परिस्थिती आता बदललेली पाहायला मिळत आहे. गेल्या हंगामात कापसाला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही. या हंगामात देखील अशीच परिस्थिती आत्तापर्यंत पाहायला मिळत आहे.

परंतु राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आगामी काळात पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल बनवण्याची शक्यता आहे. बाजार अभ्यासकांनी कापूस दरात आगामी काळात चांगली वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मागील काही दिवसांचा विचार केला असता कापसाच्या बाजारभावात शंभर रुपयांपर्यंतची भाववाढ नमूद करण्यात आली आहे.बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी विक्री वाढली आहे शिवाय आता देशांतर्गत जिनिंग सुरु होत आहेत. त्यामुळे कापसाची मागणी वाढू लागली आहे.

साहजिकच कापसाची मागणी वाढली की बाजार भावात वाढ होणे अपेक्षित असते.बाजाराच्या याच समीकरणानुसार आता भाववाढ होऊ लागली आहे. मागील आठवडाभरात कापसाचे सरासरी भाव शंभर रुपयांनी वाढलेत आणि कापसाचे किमान भाव दोनशे रुपयांनी वाढलेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कापसाच्या किमान भावात जवळपास दोनशे रुपयांची सुधारणा झाली आहे.

किमान भाव ६ हजार ८०० रुपयांवरून आता ७ हजारांवर पोहचलेत. तसेच कमाल भाव देखील ७ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत. तसेच राज्यात सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ४०० दरम्यान आहेत.

एकूणच काय की, किमान भावात दोनशे रुपयांची आणि सरासरी भावात शंभर रुपयांची वाढ झाली आहे. पण कर्नाटक आणि गुजरातमध्ये कापसाचा कमाल भाव ७ हजार ६०० रुपयांवर होता.

अर्थातच गुजरातमध्ये आणि कर्नाटक मध्ये महाराष्ट्रापेक्षा शंभर रुपये अधिक भाव मिळत आहे. दरम्यान, पुढील महिनाभरात बाजार अभ्यासकांनी कापसाच्या दरात पाचशे रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. अर्थातच कापूस लवकरच 8000 चा उंबरठा गाठणार अशी शक्यता आहे.

तथापि, सरकी ढेप आणि सरकी तेल दोघांचे भाव देशांतर्गत दबावात आहेत. जर सरकी ढेप आणि सरकी तेल या उत्पादनाच्या मागणीत आणि बाजारभावात सुधारणा झाली तर कदाचित कापसाचे भाव आठ हजाराचा उंबरठा लवकर गाठतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा