Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पिक आहे. यावर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. यावर्षी कापसाचे लागवड खानदेश मराठवाडा विदर्भ जवळपास सर्वत्र वाढली आहे.
खरं पाहता यावर्षी एक ऑक्टोबर रोजी कापसाचा हंगाम सुरू झाला. कापसाचा हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी मुहूर्ताच्या कापसाला कधी नव्हे तो असा विक्रमी बाजार भाव दिला.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर खानदेशात मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र तदनंतर व्यापाऱ्यांनी कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण घडवून आणली. कापसाच्या बाजारभावात महूर्ताचा काही कालावधी वगळता मोठी घसरण झाली.
कापसाचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात स्थिरावले होते. दरम्यान आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाच्या बाजारभावाने आता नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला आहे.
कापसाला राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9000हून अधिक बाजार भाव मिळत आहे. म्हणजेच कापसाच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तब्बल 1000 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला मिळत असलेल्या बाजार भाव विषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कापसाचे आजचे बाजार भाव.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सावनेर एपीएमसी मध्ये आज साडेआठशे क्विंटल एवढी कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 8800 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 8750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- किनवट एपीएमसी मध्ये आज 107 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावा ते एपीएमसी मध्ये कापसाला ८७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 9100 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 8900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 76 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 9051 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 9020 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :– वर्धा एपीएमसी मध्ये आज 105 क्विंटल मध्यम स्टेपलं कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला ८७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9221 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच 9050 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार मिळाला आहे.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– पुलगाव एपीएमसीमध्ये आज 125 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 8960 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारपेठ 8 हजार चारशे रुपये नमूद करण्यात आला आहे.