Kapus Bajar Bhav : कापूस (cotton crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची या राज्यातील खान्देश विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला कापसाची पंढरी म्हणून ओळखलं जातं.
मित्रांनो या वर्षी गणेश चतुर्दशीच्या दिवशी खानदेशातील काही भागात कापुस खरेदीचा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे खानदेशात मुहूर्ताच्या कापसाला तब्बल सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला होता. याप्रमाणेच आत्ताच विजयादशमीला देखील कापूस खरेदी अनेक ठिकाणी करण्यात आली.
यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी कापसाला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या (farmer) चेहऱ्यावर कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र ही तर नाण्याची एकच बाजू होती. राज्यातील अनेक भागात विजयादशमीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
मात्र सर्वत्र कापसाला चांगला समाधानकारक बाजारभाव (cotton rate) मिळाला असं नाही. तर काही ठिकाणी कापसाला अतिशय कवडीमोल पाचपुते की मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देखील विजयादशमीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी विजयादशमीच्या मुहूर्तावर कापसाला सात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव (cotton market price) मिळाला आहे.
या बाजार भावात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या मते कापूस मोजणीसाठी पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा खर्च आहे. पिकाचा इतर खत खाद्य बी बियाणे खर्च पकडता कापसाला सध्या मिळत असलेला हा बाजार भाव कवडीमोल आहे. कापसाला किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल ते पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे.
मात्र असे असले तरी काही ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला समाधानकारक बाजार भाव (cotton bajarbhav) मिळाला आहे. यामध्ये खानदेशातील जळगाव जिल्हा औरंगाबाद मधील सिल्लोड तालुका या भागाचा समावेश आहे. तसेच जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणे अपेक्षित आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मात्र खासगी व्यापाऱ्यांकडून शेवगाव तालुक्यात जी शेतकऱ्यांची लूट झाली ती निश्चितच चिंतेचा विषय आहे.