Kanda Rate : डिसेंबर 2023 पासून कांद्याचे बाजार भाव दबावात होते. आता मात्र कांदा बाजारावरील हा दबाव दूर झाला असून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच दोन दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची नाराजी अंगलट येऊ नये यासाठी केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा कांद्याची निर्यात सुरू केली आहे. दरम्यान सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. बाजारात पुन्हा एकदा कांद्याच्या दरात तेजी आली आहे.
शासनाच्या या निर्णयानंतर कांदा बाजारभावात तब्बल आठशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरे तर मान्सून सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.
हवामान खात्याने यावर्षी मानसून कालावधीत सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असे म्हटले जात आहे. एवढेच नाही तर काही तज्ञांनी यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावात सुधारणा झाली असल्याने मोठा दिलासा मिळाला असून यामुळे सध्या शेतकरी मोठे प्रसन्न झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील बाजारांमध्ये कांदा बाजारभावाची 3 हजाराच्या दिशेने वाटचाल सूरु झाली आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ? याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सहा मे 2024 ला झालेल्या लिलावात लाल कांद्याला किमान सोळाशे, कमाल 2700 आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : काल या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 750, कमाल 2700 आणि सरासरी 1550 रुपये असा भाव मिळाला आहे.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये कांद्याला किमान पंधराशे, कमाल 2500 आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 600, कमाल 2100 आणि सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.