Kanda Niryat 2024 : केंद्र शासनाने काल एक मोठा निर्णय घेतला. सरकारने डिसेंबर 2023 पासून लागू असलेली कांदा निर्यात बंदी अखेरकार उठवली आहे. काही अटी आणि शर्ती लागू करून कांदा निर्यात सुरू करण्यात आली आहे. कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी शेतकरी व्यापारी आणि निर्यातदार मंडळीच्या माध्यमातून केली जात होती. कांदा निर्यात सुरू होत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली.
ही नाराजी केंद्र सरकारला निवडणुकीच्या काळात जड जाणार असे म्हटले जात होते. दरम्यान नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी काल एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कांदा निर्यात सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान निर्यात सुरू झाल्यानंतर राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा देखील पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण निर्यात सुरू झाल्यानंतर राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2400, कमाल 2600 आणि सरासरी 2400 रुपये भाव मिळाला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल २५७१ रुपये आणि सरासरी दोन हजार रुपय असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान पंधराशे, कमाल 2422 आणि सरासरी 1961 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 2000 आणि सरासरी 1100 रुपये असा भाव मिळाला आहे.
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल 2300 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2391 आणि सरासरी 2100 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2452 रुपये आणि सरासरी 2100 रुपये असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 801 रुपये, कमाल 2551 रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 300, कमाल 2300 आणि सरासरी 1650 असा भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला किमान 1500, कमाल 2300 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 2300 आणि सरासरी 1250 असा भाव मिळाला आहे.