Kanda Market : गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव कडाडले आहेत. कांद्याच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीं येऊ लागली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कांदा निर्यात करण्यासाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आणि यानंतर कांद्याच्या बाजार भावात पडघड झाली.
याचे तीव्र पडसाद देखील उमटलेत. या निर्णयाचा विरोध म्हणून व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सामूहिक आवाज उठवला. हा निर्णय झाला तेव्हा नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी लिलाव बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थी नंतर पुन्हा एकदा लिलाव सुरू झालेत.
अशातच आता कालपासून नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कांदा बाजारात थोडीशी तेजी आली आहे. आज देखील राज्यातील काही बाजारात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला विक्रमी दर
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज लोकल कांद्याची 420 क्विंटल आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 4200 रुपये आणि सरासरी 2600 रुपये एवढा भाव मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 8822 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये कांद्याला किमान शंभर रुपये, कमाल 3300 रुपये आणि सरासरी 1700 रुपये एवढा भाव मिळाला.
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला किमान तेराशे रुपये, कमाल 2800 रुपये आणि सरासरी 2200 एवढा भाव मिळाला.