Kanda Market : गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकरण्याचा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही काळ कांद्याचा बाजार मंदित गेला. बाजारातील मंदी शेतकऱ्यांसाठी मोठी मारक ठरली. मात्र, काही दिवस कांद्याचा बाजार मंदीत राहिल्यानंतर दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत होती.
अशातच मात्र कांद्याच्या आगारात एका आठवड्यापूर्वी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले. यामुळे नासिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना भांडवल आवश्यक आहे. अशातच मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. परंतु आज नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर या उपबाजाराने उद्यापासून पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याचे जाहीर केले आहे. उद्या अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विंचूर उप बाजारात कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.
परंतु उद्या अनंत चतुर्दशी असल्याने विंचूर उपबाजारात केवळ सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत लीलाव होणार आहेत. दुपारच्या सत्रात उद्या विंचूर उपबाजार बंद राहणार आहे. 29 सप्टेंबर नंतर मात्र पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव पुर्ववत होतील.
हा निर्णय फक्त विंचूर उपबाजार पुरताच मर्यादित आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांकडून अद्याप लिलाव सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्युज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात कांद्याचे दर अजूनही तेजीतच आहेत.
आज राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला तब्बल 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज 510 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आज येथे कांद्याला किमान 800, कमाल 4500 आणि सरासरी 2650 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.