बळीराजाचे अच्छे दिन आलेत ! घाऊक बाजारात कांदा 8 हजार पार, कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Market Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये कांद्याच्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरंतर या संपूर्ण वर्षात कांद्याच्याच चर्चा पाहायला मिळाले आहेत. सुरवातीला कांद्यामुळे राजकारण देखील तापले होते. यावर्षी अगदी सुरुवातीलाच कांदा बाजारभावात मोठी मंदी आली होती.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. परिस्थिती एवढी बिकट होती की शेतकऱ्यांना कांदा बाजारात घेऊन जाण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च देखील वसूल करता येत नव्हता. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी बनले होते.

म्हणून त्यावेळी शेतकरी संघटनांच्या आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे अनुदानासाठी मागणी करण्यात आली होती. परिस्थितीची जाणीव ठेवता शासनाने देखील शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान जाहीर केले होते.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला शासनाने 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले आहे. सध्या हे अनुदान वितरणाचे काम सुरू आहे. राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातही सुधारणा झाली आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे सरासरी बाजार भाव 80 रुपये प्रति किलोचे आसपास आहेत.

यामुळे गेल्या कित्येक दिवसानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वीच बाजारभावात सुधारणा झाली असल्याने सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असे चित्र तयार झाले आहे. काल देखील राज्यात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.

काल अर्थातच दोन नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17 हजार 952 लाल कांदा आवक झाली होती. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 500, कमाल 8000 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.

याशिवाय काल नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान 5000, कमाल 6000 आणि सरासरी 5750 असा विक्रमी भाव मिळाला आहे.

विशेष म्हणजे काल उन्हाळी कांद्याला देखील चांगला दर मिळाला आहे. रामटेक एपीएमसी मध्ये काल उन्हाळी कांद्याला कमाल 6000 आणि सरासरी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटरचा भाव मिळाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा