शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रात कांद्याचे भाव पुन्हा 6 हजाराच्या घरात, इथे मिळाला सर्वोच्च दर, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Market 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा दायक बातमी समोर आली आहे. आता राज्यात कांद्याच्या दरात पुन्हा एकदा भाव वाढ होऊ लागली आहे. खरं तर गेल्या आठवड्यात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली होती.

याचा परिणाम म्हणून बाजारभावात किंचित घसरण पाहायला मिळाली. अशातच मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.

सव्वीस तारखेला राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ख्यातनाम असलेल्या नाशिक जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. याशिवाय राज्यातील विविध भागांमध्ये 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पाऊस सुरू आहे.

दरम्यान या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.यामुळे राज्यातील लाल आणि रांगडा कांदा पीक मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले आहे.

याशिवाय कांदा चाळीत साठवलेला उन्हाळी हंगामातील माल देखील यामुळे खराब होणार आहे. ढगाळ हवामान आणि ओलाव्यामुळे कांदा चाळीतील माल खराब होत आहे. यामुळे भविष्यात कांद्याचा मोठा शॉर्टज निर्माण होण्याची शक्यता तयार होत आहे.

हेच कारण आहे की, सध्या बाजारात कांद्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. आजच्या लिलावात देखील महाराष्ट्रातील काही बाजारात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.

यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता आपण आज राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे हे जाणून घेणार आहोत. 

कुठं मिळाला विक्रमी भाव

गेल्या आठवड्यापर्यंत दबावात असलेले कांदा बाजार भाव आता पुन्हा एकदा सुधारू लागले आहेत. आज राज्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमाल 5500 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळालाय. अर्थातच या बाजारात आता कांदाच्या आजाराच्या घरात पोहोचला आहे.

शिवाय भाव वाढ झाली असल्याने आगामी काळात दरात आणखी वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना लागलीये. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार तीनशे रुपये कमाल 5500 रुपये आणि सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा