Kanda Bajarbhav : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात या पिकाची शेती केली जाते. अहमदनगर आणि नासिक या दोन जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे.
या दोन जिल्ह्यातून भारतातील उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो, याशिवाय या दोन जिल्ह्यातून बांगलादेशला देखील मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जातो.
मात्र सध्या उत्तरेकडील राज्यात मध्यप्रदेशचा कांदा विक्रीसाठी दाखल होत असल्याने आणि हा कांदा उत्तरेकडे राज्यांना स्वस्तात पडत असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला उठाव कमी आहे. तसेच महाराष्ट्रातून विशेषता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशला होणारी कांदा निर्यात प्रभावीत झाली आहे.
बांगलादेश मध्ये आर्थिक संकट यामागील मुख्य कारण असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. एकंदरीत कांदा निर्यातीसाठी अडथळे येत असल्याने तसेच उत्तरेकडिल राज्यात मध्यप्रदेश सारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यातील कांदा विक्रीसाठी जात असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला उठाव कमी आहे आणि परिणामी दरात मोठी घसरण होत आहे.
याशिवाय नोव्हेंबर मध्यापर्यंत उन्हाळी हंगामातील कांदा संपत असतो मात्र यंदा समीकरण पूर्ण उलट झाल आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील जुना कांदा अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे आवक वाढली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक आहे.
साहजिकच यामुळे कांदा दरात मोठी घट झाली आहे. दरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याला सर्वोच्च दर मिळाला आहे. पिंपळगाव एपीएमसी मध्ये आज पावसाळी कांदा अर्थातच पोळ कांद्याची 2375 क्विंटल आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये या कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2700 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.
परंतु असे असले तरी आज फक्त पिंपळगाव एपीएमसीमध्ये आवक झालेल्या पोळ कांद्याला चांगला दर मिळाला आहे. राज्यातील इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र 1000 रुपये प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.