Kanda Bajarbhav : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र शासनाने 7 डिसेंबर 2023 ला एक अधिसूचना जारी करत 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू राहणार असा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे डिसेंबर महिन्यापासून कांदा बाजार भाव दबावात आले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून निघाला नाही. कित्येक शेतकऱ्यांना तर वाहतुकीचा खर्च देखील वसूल करता आला नाही. दरम्यान 31 मार्च नंतर कांद्याचे निर्यात बंदी उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र केंद्र सरकारने 31 मार्चनंतर देखील कांदा निर्यात बंदी जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कायम राहणार असा निर्णय घेतला.
किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे बोलले जात आहे. मात्र सरकारच्या या तुगलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अजूनही बाजारात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. अशातच, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने युएई आणि बांगलादेशला प्रत्येकी 10,000 टन म्हणजेच एकूण 20000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्यात बंदी लागू असतानाही या दोन मित्र देशांना कांदा पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र जाणकार लोकांनी या निर्णयामुळे कांदा बाजार भावाला काहीच आधार मिळणार नसल्याचे म्हटले आहे. कारण की ही निर्यात एनसीईएल या सरकारी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
हेच कारण आहे की व्यापारी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्यात बंदी ताबडतोब खुली केली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आज आपण सरकारने वीस हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर बाजारात कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 600, कमाल 1800 आणि सरासरी 1200 रुपये भाव मिळाला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 1500 आणि सरासरी 1300 रुपये भाव मिळाला आहे.
सांगली भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 400, कमाल 1700 आणि सरासरी 1050 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 1500 आणि सरासरी 1350 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 1786 आणि सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 1500 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल 1701 आणि सरासरी 950 असा भाव मिळाला आहे.
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल 1600 आणि सरासरी 900 रुपये भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 300, कमाल सोळाशे आणि सरासरी 1300 रुपये भाव मिळाला आहे.