Kanda Bajar Update : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेती केली जाते. अर्थातच या नगदी पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्यावर्षापासून कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. खरं पाहता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2022 या महिन्यात कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. त्यावेळी कांदा तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दरात तर तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच्या कमाल बाजारभावात विक्री होत होता.
मात्र तदनंतर कांदा भावात मोठी घसरण झाली. सद्यस्थितीला कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. आज देखील हेच भाव पातळी कायम राहिली. मात्र आज रामटेक एपीएमसीमध्ये उन्हाळी कांदा 1,900 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8181 क्विंटल चिंचवड कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 1,910 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव एक हजार 300 रुपये नमूद झाला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज चार हजार 961 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1330 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल 1200 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज दहा हजार नऊ क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 600 रुपये किमान, 800 रुपये कमाल आणि 1200 रुपये सरासरी दर मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज का 548 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 1500 रुपये आणि 1,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 17,310 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला किमान 300 रुपये, कमाल 2000 आणि सरासरी 1200 रुपये दर नमूद झाला आहे.