Kanda Bajar Bhav : धक्कादायक ! एका रात्रीतच कांद्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे कांदा बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajar Bhav : कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत होती. मात्र आज पुन्हा कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) घसरण झाली आहे. आज भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) कांद्याला अवघा 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा दरवाढीची आशा फोल ठरली आहे. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याला 1250 रुपये प्रतिक्विंटल पासून ते दोन हजार 150 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे.

खरं पाहता काल अमरावती भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला (Onion Crop) तब्बल 3 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. मात्र आज कांद्याचा बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे कांदा पुन्हा एकदा बेभरवशाचा ठरला आहे. दरम्यान राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अपेक्षित नाही मात्र समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांना (Farmer) थोडा दिलासा मिळत आहे.

मात्र भुसावळ एपीएमसीमध्ये लाल कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली असल्याने आगामी काळात कांद्याच्या बाजारभावात अजून घसरण होईल की काय अशी शंका आता शेतकरी बांधवांची चिंता वाढवत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोज कांद्याच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 वाजेपर्यंत झालेल्या लिलावाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/10/2022
कोल्हापूरक्विंटल477170025001500
औरंगाबादक्विंटल76040021001250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11068140024001900
खेड-चाकणक्विंटल1750150023001900
साताराक्विंटल195100021001600
कराडहालवाक्विंटल15050020002000
धुळेलालक्विंटल21015020001500
नागपूरलालक्विंटल1380100025002150
भुसावळलालक्विंटल10120012001200
पुणेलोकलक्विंटल826680021001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20100018001400
वाईलोकलक्विंटल25100020001500
कामठीलोकलक्विंटल10100016001500
कल्याणनं. १क्विंटल3160024002000
नागपूरपांढराक्विंटल1000100025002150
येवलाउन्हाळीक्विंटल900020022011550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300010022811550
लासलगावउन्हाळीक्विंटल1050090023001900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300025022051790
चांदवडउन्हाळीक्विंटल520070123411650
मनमाडउन्हाळीक्विंटल350070019701650
देवळाउन्हाळीक्विंटल7380100021051850
शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment