खुशखबर ! ‘त्या’ 38 हजार शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदानाचा लाभ, 70 हजारापर्यंतची सबसिडी होणार खात्यात जमा, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan Maharashtra : या चालू वर्षातील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे भाव खूपच गडगडले होते. कांद्याला मात्र 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होता. जिथे कांदा उत्पादित करण्यासाठीच प्रतिक्विंटल हजारो रुपयांचा खर्च येतो तिथे एवढ्याशा बाजारभावात पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना वसूल करता येत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढत होती.

परिणामी विविध पक्षातील नेत्यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातं अनुदान देण्याची मागणी केली. यासाठी विविध नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. कांदा उत्पादकांना किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान मिळावे अशी मागणी विधिमंडळात करण्यात आली. विविध शेतकरी संघटनांनी देखील या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सूरु केला.

दरम्यान या पाठपुराव्याला यश आले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रतिक्विंटल एवढे 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थातच कांदा उत्पादकांना 70,000 पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर आणि याचा जीआर निर्गमित झाल्यानंतरही अजून पर्यंत कांदा उत्पादकांना अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही.

यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती आता पुन्हा एकदा येऊ लागली आहे. अशातच मात्र कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान कांदा उत्पादकांना अनुदानाचा पैसा मिळु शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

दरम्यान या कांदा अनुदानाचा सोलापूर जिल्ह्यातील 38 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांकडे कांदा विक्री केलेल्या ४६ हजार ९० शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले होते. हे प्रस्ताव सादर झाल्यानंतर याची छाननी करण्यात आली.

यातून ३८ हजार २०४ शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत. आता या अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना १०१ कोटी १६ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच कांदा अनुदानासाठी जिल्ह्यातील 7 हजार 86 शेतकरी अपात्र ठरले आहे.

निश्चितच अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी देखील पाहायला मिळत आहे. मात्र जे शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत त्यांना आता येत्या काही दिवसात अनुदानाचा पैसा वितरित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा