जस जसा उन्हाळा वाढू लागला आहे. तशी शेतकऱ्यांची शेतात उन्हाळ्यातील पिके घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सध्याचे दर आणि वाढती मागणी पाहता. कलिंगड लागवडी तून चांगले पैसे मिळणार आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात कलिंगड बाजारात दाखल होणारच की बाजारपेठा बंद असल्या कारणाने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सध्या बाजारपेठ आणि खुल्या असल्याने आणि कलिंगडाची वाढती मागणी पाहता कलिंगडाचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कलिंगड हे हंगामी पीक असून ते लागवड केल्यापासून अडीच महिन्यातच विक्रीयोग्य होते.या पिकाचा कालावधी कमी असला तरी योग्य काळजी घेतल्यास कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादना बरोबरच चांगले पैसे देखील भेटणार आहे. कडाक्याचे ऊन आणि बाजारातील वाढती मागणी पाहता. कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते.
खानदेशात कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.तर कलिंगडाला शेतकऱ्यांच्या बांधावर 8 ते 11 रुपये किलो दर मिळत असून उत्पादन खर्च काढल्यास किमान 7 ते 8 रुपये जरी दर मिळाला तरी शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. कलिंगड लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतजमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे आहे. जरा उशीर झाला असला तरी थेट नर्सरी मधून रोपे आणून लागवड केलेली फायदेशीर ठरेल.
हिरव्या पातीचे, काळ्या पातीचे असे वाण असून हे जमिनीनुसार शेतकऱ्यांनी त्याची निवड करावी. मशागत केलेल्या शेतात शेणखत बेड तयार करून त्यावर मल्चिंग टाकून रोपांची लागवड करून घ्यावी.
मल्चिंग पेपर मुळे किट व रोगराई प्रादुर्भाव तर होतच नाही शिवाय पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाचा वापर करुन पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते.