Jamin Mojani News : शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, जमिनीवरून नेहमीच वाद विवाद होत असतात. हे वाद विवाद टाळण्यासाठी जमिनीची मोजणी करणे हा सर्वात चांगला पर्याय ठरतो. अनेकजण जमिनीची शासकीय मोजणी करतात. मात्र आता जमिनीची मोजणी करणे आणखी महाग होणार आहे.
कारण की, सरकारने आता जमीन मोजणीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. यामुळे जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून अलीकडच्या काही काळात सुरू झालेल्या शासकीय योजनांमुळे सरकार तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोजा येत असून याचीच भरपाई करण्यासाठी शासन आता विविध शासकीय शुल्कांत जबर वाढ करीत आहे. आता शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून ते थेट ५०० रुपये करण्यात आले.
फक्त शेत जमीनच नाही तर प्लॉटच्या मोजणीचेही दर वाढवण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाने जमीन मोजणीच्या दरात नेमकी किती वाढ केली आहे याविषयी आढावा घेणार आहोत.
जमीन मोजणी साठी किती शुल्क भरावे लागणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी शासकीय जमीन मोजणी चे तीन प्रकार होते. साधी, तातडीची आणि अति तातडीची अशा तीन प्रकारची मोजणी केली जात असे. पण आता जमीन मोजणीचे प्रकार फक्त साधी आणि जलदगतीची असे राहणार आहेत.
दोन हेक्टरपर्यंत साध्या मोजणीसाठी दोन हजार आणि दोन हेक्टरवर पुन्हा दोन हेक्टर असेल तर पुन्हा दोन हजार किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. असेच शुल्काचे प्रमाण जलदगती मोजणीसाठीही आहे. जलद गती मोजणीसाठी आधी 3 हजार रुपये खर्च होता मात्र आता आठ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
व्यावसायिक भूखंडाच्या मोजणीचा विचार केला असता आधी एक सर्व्हे नंबर, गट नंबर, पोटहिस्से, प्लॉट, मंजूर रेखांकनातील भूखंडाच्या साधी मोजणीसाठी (एक हेक्टरपर्यंत) पूर्वी एक हजार रुपये आणि अतितातडीच्या मोजणीसाठी ३ हजार रुपये भरावे लागत होते.
आता साधी जमीन मोजणीसाठी ३ हजार रुपये, तर जलदगती मोजणीसाठी १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील भूखंडाच्या मोजणीसाठी नव्या दरानुसार साधी जमीन मोजणीसाठी तीन हजार अन जलदगती मोजणीसाठी १२ हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.