Jaggery Making Business : बातमी कामाची ! असा तयार होतो उसापासून गूळ, ऊस उत्पादक गूळ बनवून बनू शकतात मालामाल, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jaggery Making Business : मित्रांनो आपल्या भारतात उसाची लागवड (Sugarcane Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस लागवड (Sugarcane Crop) पाहायला मिळते. जलसंधारणची कामे यशस्वीरित्या झाल्यानंतर बागायती पीक उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. ऊस हे नगदी पीक (Cash Crop) असले तरीदेखील गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येतो.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी ऊसावर प्रक्रिया करून सेंद्रिय गूळ (jaggery making business) उत्पादित करून विक्री केली तर त्यांना यातून दिलासा मिळणार आहे आणि चांगली कामे देखील होणार आहे. शेतकरी बांधवांनी (Farmer) सेंद्रिय गूळ उत्पादित केल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

गुळाचा वापर हा पदार्थ गोड करण्यासाठी केला जातो. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता येते. गोडपणासाठी साखरेचे सेवन चांगले मानले जात नाही, परंतु गुळामुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. हा गूळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. आजकाल साखरेप्रमाणे गुळही कारखान्यांमध्ये बनवला जात आहे.

मात्र पारंपरिक पद्धतीने उसाचा रस काढून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या गुळाला बाजारात मोठी मागणी आहे. सेंद्रिय गुळाचे महत्त्व आजही बाजारात आणि घरांमध्ये जास्त आहे. ऊस उत्पादकांनी डायरेक्ट उस विकण्याऐवजी गूळ बनवून विकल्यास त्यांना दुप्पट नफा मिळतो. चला तर मग या लेखात गूळ बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

उसापासून गूळ कसा बनवायचा?

 • गूळ बनवण्यासाठी प्रथम उसाचा रस काढला जातो.
 • उसाचा रस काढण्यासाठी क्रशरचा वापर केला जातो. बाजारात क्रशरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. शेतकरी बांधव आपल्या बजेटनुसार क्रशर घेऊ शकतात.
 • उसाचा रस काढल्यानंतर मलमलच्या कापडातून गाळून भट्टीवर ठेवलेल्या पॅनमध्ये शिजवले जाते.
 • उसाचा पेंढा इंधन म्हणून भट्टीत जाळला जाऊ शकतो.
 • भट्टीवर रस हळूहळू शिजवला जातो.
 • शिजल्यानंतर उसाच्या रसाचा रंग सोनेरी होतो.
 • नंतर ते मोठ्या ट्रेवर किंवा मोठ्या सिमेंटच्या गुळगुळीत फरशीवर ओतून थंड केले जाते.
 • या दरम्यान, ते सतत स्क्रॅपर किंवा भात्याने चालवून उलटवावे लागते.
 • थंड झाल्यावर ते काही काळ मऊ राहते.
 • या दरम्यान, तुम्ही त्याला वेगवेगळे आकार देऊ शकता.
 • अशा प्रकारे तुमचा गूळ तयार होईल.

गुळाचे मार्केटिंग असे करा

गुळाचे मार्केटिंग करणे खूप सोपे आहे. तूम्ही प्रदर्शनी, जत्रेत, मिठाईच्या दुकानात किंवा मॉलमध्ये सेंद्रिय गूळ सहज विकू शकता. याशिवाय तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवून गूळ विकू शकता. सणासुदीच्या काळात गुळाची मुबलक विक्री होते.  त्यामुळे या दिवसांत तुम्ही थेट ग्राहकाला गूळही विकू शकता.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment