काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) बदल केले तर निश्चितच यशस्वी होता येऊ शकते. पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिकतेची कास धरून पीकपद्धतीत वाजवी बदल (Cash Crop) करून कष्टाची सांगड घातली तर काय होऊ शकते याचेचं उत्तम उदाहरण समोर आले आहे ते नांदेड (nanded) जिल्ह्यातुन.
नियोजनाला परिश्रमाची सांगड घातली तर अशक्य देखील शक्य करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे अर्धापूर तालुक्यातील मौजे लोणी येथील एका नवयुवक शेतकऱ्याने.
मौजे लोणी येथील भास्कर लोणे या नवयुवक शेतकऱ्याने शेतीत काहीतरी नवीन आणि जरा हटके करायचं असा निर्धार करीत मराठवाड्यासारख्या भागात फनसची शेती (Jackfruit Cultivation) यशस्वी करण्याची किमया साधली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फणसची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोकणात बघायला मिळते. कोंकण व्यतिरिक्त इतरत्र याची शेती केली जात नाही, असे असले तरी मात्र एक-दोन झाड सर्वत्र महाराष्ट्रात बघायला मिळू शकते.
भास्कर यांनी मात्र भौगोलिक स्थिती आणि फणस साठी आवश्यक पोषक वातावरणाचा अभ्यास करत लोणी सारख्या गावात फणस शेती यशस्वी करून दाखवली.
त्यांनी सात वर्षांपूर्वी फणस शेती करण्याचा निर्धार केला होता. भास्कर यांनी सात वर्षापूर्वी फणसाची लागवड केली मात्र तब्बल सात वर्ष यापासून एक रुपया देखील भास्कर यांना मिळाला नाही.
मात्र, या परिस्थितीवर मात करीत त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन फणसची बाग जोपासली. या अहोरात्र घेतलेल्या कष्टाचे आणि सातत्याचे आता चीज होताना बघायला मिळत आहे.
सात वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली फणस बाग आता उत्पादन देण्यास सज्ज झाली आहे, यावर्षी भास्कर यांचे फणस पहिल्यांदाच बाजारपेठेत चमकू लागले आहे.
या पासून किती उत्पन्न मिळेल याच्या उत्सुकतेपेक्षा आणि चिंतेपेक्षा आपले फणस बाजारपेठेत दाखल होत आहे याचा आनंद भास्कर यांच्या चेहऱ्यावर अधिक आहे.
शेतीक्षेत्रात काळाच्या ओघात बदल होत आहेत मात्र बदल उत्पादन वाढवण्यासाठी केले जात आहेत. उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव नगदी पिकांची लागवड करतात तसेच जे पीक बाजारपेठेत विकले जाते त्याच पिकांची आता शेतकरी बांधव लागवड करू लागले आहेत यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा मोठा फायदा देखील होत आहे.
पण भास्कर यांनी तब्बल सात वर्षे कुठल्याही उत्पादनाची आशा न करता फणस बाग जोपासली. फणस बागेसाठी पाण्याचे आणि खताचे योग्य व्यवस्थापन केले.
याशिवाय त्यांनी फणस बाग जोपासण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. विशेष म्हणजे लोणे व आजूबाजूच्या पंचक्रोशीत फणसाची लागवड बघायला मिळत नाही मात्र भास्कर यांनी डेरिंग करत या पिकाची लागवड केली.
आता यापासून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. भास्कर यांनी 55 फणस विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवले होते त्याबदल्यात त्यांना पाच हजार रुपये मिळाले. एका फणसला सुमारे नव्वद रुपये दर मिळत आहे.