ITBP Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयटीबीपी अर्थातच इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे आयटीबीपी मध्ये जॉब करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.
दरम्यान या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल/ जनरल ड्युटी (स्पोर्ट्समॅन) या पदासाठी भरती होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत.
किती पदांसाठी होणार भरती
आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी स्पोर्ट्समनची एकूण 71 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान या पदांसाठी 20 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
कसा करायचा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर जाहिरात सविस्तर वाचून या पदासाठी आपण पात्र आहोत की नाही याची खातरजमा करून घ्यायची आहे. यानंतर इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक पात्र उमेदवार https://www.itbpolice.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर थेट अर्ज करू शकणार आहेत. तसेच अर्ज करण्यापूर्वी https://recruitment.itbpolice.nic.in/ या लिंक वर जाऊन पात्र उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता व इतर निकष समजून घ्यायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
आयटीबीपी अंतर्गत आयोजित झालेल्या या पदभरतीसाठी 20 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 मार्च 2023 राहणार आहे. यामुळे या विहित कालावधीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 18 ते 23 वयोगटातील असणे अनिवार्य राहणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्जासाठी फी
जनरल, ओबीसी आणि ए डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. एससी एसटी आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना मात्र अर्ज फि या ठिकाणी राहणार नाही.
किती वेतन मिळणार
21 हजार 700 ते 69 हजार 100 दरम्यान वेतन देय राहणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी अधीसूचना काळजीपूर्वक वाचावी.