Sarkari Yojana: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली.या योजनेचा गैरफायदाही अनेकांनी घेतल्याचे माहिती दरम्यान समोर आले.
तर या योजनेत अपात्र शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये जे आयकर अदा करतात किंवा शासकीय नौकरदार आहेत, त्यांना याचा लाभ घेता येत नव्हता.तरी ही त्यानी या योजनेचा लाभ घेतला.तर अशा शेतकऱ्यांनी ही रक्कम परत करायची आहे.
पैसे परत देण्यासाठी अनेकांना वेगळे वाटत असले तर अशा व्यक्तींना आता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरुनही परतावा करता येणार आहे. त्यामुळे तुमचे नावही गुपित राखले जाणार आहे.
आणि सरकारचा उद्देशही साध्य होणार आहे.आता हा देखील एक मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.inhttp://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. येथील होमपेजवरच Former Corner च्या एकदम खाली तुम्हाला Refund Online हा पर्याय दिसेल.
या ठिकाणी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि खाते क्रमांक याची माहिती भरुन योजनेतील पैसे परत करता येणार आहेत. या योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची यादी ही महसूल विभागाकडे आली आसून अपात्र नागरिकांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांनी सगळ्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार.