देशातला सर्वात लांबीचा सागरी पूल महाराष्ट्रात ! ‘या’ तारखेला PM मोदी करणार उद्घाटन, कसा असेल रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India’s Longest Sea Bridge : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. शहरातील आणि उपनगरातील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारित करण्यासाठी काही महत्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी काही प्रकल्पांची कामे आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहेत.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा देखील असाच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा मुंबई मधील एक अतिशय बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार एमटीएचएल प्रकल्प नवीन वर्षात सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवली जात आहे.

एमटीएचएल प्रकल्पाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. यामुळे हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिना निमित्त सुरू करण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले होते.

पण अटल सेतू 25 डिसेंबर पर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा प्रकल्प नवीन वर्षातच सुरू होणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं. दरम्यान २५ डिसेंबर ची डेडलाईन हुकणार ही शक्यता लक्षात घेता वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

फडणवीस यांनी हा प्रकल्प जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अशातच आता या प्रकल्पाच्या लोकार्पणाची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

12 जानेवारी 2023 ला पंतप्रधान महोदय यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान याच दौऱ्याच्या वेळी मुंबईमधील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पचे लोकार्पण केले जाणार अशी बातमी काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. एमटीएचएल प्रकल्प अंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान 21.08 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू तयार केला जाणार आहे.

यापैकी जवळपास 16 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर आहे तर उर्वरित भाग जमिनीवर तयार करण्यात आला आहे.यामुळे हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त वीस मिनिटात पार होऊ शकते असा दावा केला जात आहे.

या पुलामुळे मुंबईहून पुण्याला जाणेदेखील सोयीचे होणार आहे. कारण की एमटीएचएल प्रकल्पापासून मुंबई-पुणे महामार्गापर्यंत एक कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या पुलामुळे भविष्यात पुणे ते मुंबई हा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होईल असा आशावाद काही जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या पुलावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पाचशे रुपयांपर्यंतचा टोल द्यावा लागू शकतो असा अंदाज आहे. तथापि याबाबत सरकारच्या माध्यमातून अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे जेव्हा या पुलाचे लोकार्पण होईल तेव्हाच टोल दराबाबत योग्य ती कल्पना येऊ शकणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा