‘हे’ आहेत भारतातील 3 सर्वात मोठे रेल्वे स्थानक, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध स्थानकाचाही होतो समावेश, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indias Largest Railway Station : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच अधिक आहे. असे सांगितले जाते की देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रवासासाठी रेल्वेचा वापर करत असते. अनेक लोक दैनंदिन कामासाठी रेल्वेने प्रवास करतात. तर काही लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात.

यामुळे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधेसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत. बुलेट ट्रेन देखील लवकरच रुळावर धावणार आहे.

याशिवाय ज्या ठिकाणी अजून रेल्वे पोहोचलेली नाही तिथे रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रात पुणे ते नाशिक दरम्यान अजून रेल्वे मार्ग तयार झालेला नाही यामुळे या ठिकाणी रेल्वे मार्ग तयार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

रेल्वे मार्ग तयार करण्यासोबतच रेल्वे स्थानकांवर देखील अनेक महत्त्वाची कामे केली जात आहेत. रेल्वे स्टेशन रिनोव्हेट केले जात आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाणार आहे. एकंदरीत देशातील करोडो नागरिकांचा रेल्वेशी सबंध आहे. केव्हा ना केव्हा तुम्हीही रेल्वेने प्रवास केला असेलचं.

पण तुम्हाला माहिती आहे का देशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहे, सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्थानक कोणते आहे ? कदाचित तुम्हाला याविषयी माहिती नसेल. यामुळे आज आपण भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेल्या टॉप तीन रेल्वे स्थानकांची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलप्रमाणे

हावडा रेल्वे स्थानक : पश्चिम बंगालमधील हे रेल्वे स्थानक देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्थानक आहे. कोलकत्यामधील हे रेल्वे स्थानक देशातील एक अतिशय महत्त्वाचे आणि सर्वात जास्त व्यस्त रेल्वेस्थानकांपैकी एक आहे.

अगदी स्वातंत्र्यपूर्वपासून हे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. दरम्यान या रेल्वे स्थानकावर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. शिवाय या रेल्वे स्थानकावर 26 ट्रॅक ची रेल्वे लाईन देखील टाकण्यात आली आहे. या ठिकाणाहून देशातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध होतात.

सियालदह : देशातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालमधीलचं सियालदह स्थानकाचा नंबर लागतो. हे देखील देशातील एक प्रमुख आणि अतिशय व्यस्त रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर 20 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. येथे तुम्हाला देशातील प्रत्येक कोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे गाडी उपलब्ध होते.

सी एस एम टी : या यादीत तिसऱ्या क्रमांकावर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा नंबर आहे. हे देशातील एक प्रमुख आणि अतिशय व्यस्त रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून तुम्हाला कुठेही जायचे असेल तरीदेखील रेल्वे उपलब्ध आहे.

या स्थानकाला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात होते. यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थातच सीएसटी म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र आता या रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जात आहे. या रेल्वे स्थानकावर 18 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा