India’s Cheapest Dry Fruit Market 2024 : भारतात सुकामेव्याला मोठी मागणी आहे. काजू आणि बदाम हा सुका-मेवा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे डॉक्टर सुका-मेवा खाण्याचा सल्ला देत असतात. मात्र काजू आणि बादाम सारख्या सुकामेव्याच्या किमती बाजारात खूपच अधिक आहेत.
सध्या बाजारात काजू-बदामच्या किमती एकच हजार रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत. मात्र आरोग्यासाठी गुणकारी असलेले हे काजू बदाम 30 ते 40 रुपये प्रति किलो दरात उपलब्ध होत असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसणार का ? कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही.
मात्र भारतात असे एक राज्य आहे जिथे काजू अन बदाम खूपच स्वस्तात मिळतात. मीडिया रिपोर्टनुसार, एकीकडे देशातील काही भागात सर्वसामान्यांना काजू-बदाम खरेदी करणे शक्य होत नाही.
तर दुसरीकडे भारतात असेही एक राज्य आहे जिथे काजू बदाम 30 ते 40 रुपये प्रति किलोच्या बाजारभावात उपलब्ध होत आहेत.
निश्चितच आता तुम्हाला 1000 रुपये प्रति किलोच्या दरात उपलब्ध होणारे काजू बदाम 30 ते 40 रुपये प्रति किलोत कुठे उपलब्ध होते हे जाणून घ्यायचे असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
भारतातील सर्वात स्वस्त सुकामेवा मार्केट
सर्वात स्वस्त सुकामेवा भारतातच उपलब्ध होतो. मीडिया रिपोर्ट वर जर विश्वास ठेवला तर भारताच्या झारखंड राज्यात सर्वात स्वस्त ड्रायफ्रूट्स विकले जात आहेत.
याचे कारण म्हणजे झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. झारखंडमधील जामतारा जिल्हा हा काजूचे आगार म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो.
आपल्याकडे ज्याप्रमाणे कांदा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांची शेती केली जाते त्याप्रमाणे तिथे काजूची लागवड होते. त्या ठिकाणी काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचे उत्पादन होत असल्याने तिथे सुक्या मेव्याचे भाव खूपच कमी असतात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारतीय बाजारात चांगल्या काजूची किंमत 900 ते 1000 रुपये प्रति किलो आहे.
पण जामतारा येथे लोक रस्त्याच्या कडेला काजू आणि बदाम विकतात. येथे काजू ३० रुपये किलो आणि बदाम ४० रुपये किलोने सहज खरेदी करता येतात.