रेल्वेचा प्रवास होणार स्वस्त ! तिकिट दरात ‘या’ नागरिकांना मिळणार तब्बल 75 टक्के सूट, कोणत्या ट्रेनमध्ये लागू होणार सवलत? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Ticket : देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनांचा वापर केला जातो. मात्र यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात.

दरम्यान खाजगी वाहनांचा वापर कमी व्हावा आणि सार्वजनिक वाहतूकीने नागरिकांनी अधिक प्रवास करावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या योजना देखील राबवल्या जातात. प्रवाशांना प्रवासादरम्यान वेगवेगळ्या सुविधा रेल्वे पुरवते. तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तिकीट दरात देखील रेल्वेकडून सवलत दिली जाते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय रेल्वे देशातील काही नागरिकांना रेल्वेचा प्रवास स्वस्तात व्हावा यासाठी तब्बल 75 टक्के एवढे तिकीट दरात सवलत देत आहे. यामुळे जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

कारण की आज आपण भारतीय रेल्वे कोणत्या नागरिकांना प्रवासासाठी 75 टक्के सवलत देत आहे आणि ही सवलत कोणत्या ट्रेनमध्ये प्रवासासाठी दिली जाते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या प्रवाशांना मिळणार सवलत?

हाती आलेल्या माहितीनुसार रेल्वेने प्रवास करणाऱ्या दिव्यांगजन, मतिमंद, दृष्टिहीन तसेच ज्या व्यक्ती एकट्याने प्रवास करू शकत नाहीत म्हणजे ज्या व्यक्तींना प्रवासासाठी दुसऱ्या व्यक्तींची गरज भासते अशा लोकांना तिकीट दरात 75% पर्यंतची सवलत दिली जाते.

कोणत्या गाडीत मिळते सवलत 

या अशा लोकांना वेगवेगळ्या गाडींमध्ये 25% पासून ते 75% पर्यंतची सूट दिली जाते. असे लोक जर जनरल क्लास, स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करत असतील तर त्यांना 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. तसेच जर असे लोक 1AC आणि 2AC ने प्रवास करत असतील तर त्यांना तिकीट दरात 50 टक्के सूट बहार केली जाते.

याशिवाय जर असे नागरिक थर्ड एसी आणि एसी चेअर कारमध्ये प्रवास करत असतील तर त्यांना तिकीट दरात 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. एवढेच नाही तर असे लोक दुसऱ्याच्या आधाराविना प्रवास करू शकत नाही यामुळे अशा व्यक्तीसोबत जें व्यक्ती प्रवास करतात त्यांना देखील रेल्वेच्या तिकिटांवर तेवढीच सूट देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.