Indian Railway News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. डिजिटल पेमेंटसाठी अनेक ॲप्लिकेशन बाजारात उपलब्ध झाले आहेत. डिजिटल पेमेंटचा वाढता वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. यामुळे नागरिकांचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि जलद झाले आहेत. यामुळे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करता येऊ लागले आहेत.
सरकार देखील कॅशलेस इकॉनोमीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सरकारच्या माध्यमातून यासारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या वापराला प्रोत्साहित केले जात आहे. परिणामी देशात डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा वापर वाढत आहे. यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचत आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देखील दाखवला आहे. पेटीएम, फोन पे, गुगल पे, भीम युपीआय यांसारख्या असंख्य एप्लीकेशनचा डिजिटल पेमेंटसाठी वापर केला जात आहे.
विशेष म्हणजे हे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आता आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देखील पुरवत आहे. यामध्ये ग्राहकांना वीज बिल, फोन बिल, मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज, कर्जाचा EMI, क्रेडिट कार्ड बिल, SIP सुद्धा करता येत आहे. दरम्यान आता गुगल पे या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
गुगल पे ने आता रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून रेल्वे तिकीट बुकिंग करताना येणाऱ्या विविध अडचणींचा यामुळे निकाल लागणार आहे. दरम्यान आता आपण गुगल पे चा वापर करून रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Google Pay वर अस बुक करा ट्रेनच तिकीट
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे ॲप्लिकेशन मध्ये जायचे आहे. एप्लीकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ConfirmTkt या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर तिकीट बुकिंगचा इंटरफेस ओपन होईल. येथे तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती भरावी लागणार आहे.
Enter From या रकान्यात जेथून तुम्ही प्रवास करणार आहात ते स्थानक निवडायचे आहे आणि Enter To या रकान्यात ज्या स्थानकापर्यंत तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या स्थानकाचे नाव निवडायचे आहे. यानंतर तुम्हाला खाली Search Train चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला ट्रेन सिलेक्ट करावी लागणार आहे. मग तुम्हाला साइन इन करावे लागेल.
साइन इन करताना तुम्हाला सर्व आवश्यक ती माहिती फिलअप करावी लागणार आहे. मग पुन्हा एकदा तुम्हाला ट्रेन सिलेक्ट करावी लागणार आहे. यानंतर मग ट्रेन क्लास सिलेक्ट करा आणि पुन्हा बुक या ऑपशनवर क्लिक करायचे आहे. बुकच्या खाली अमाउंट देखील दिलेली असेल. त्यानंतर मग तुम्हाला IRCTC अकाऊंटची माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. जर तुमच्याकडे IRCTC अकाऊंट नसेल तर तुम्हाला हे अकाऊंट तयार करावे लागणार आहे.
एवढे केल्यानंतर तुम्हाला पैसेजेंरची सर्व माहिती भरावी लागणार आहे. मग सर्व डिटेल्स कंफर्म कराव्या लागतील. पुढे मग Continue या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुम्हाला तिकीटसाठी पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्हाला पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. पेमेंट मेथड सिलेक्ट केल्यानंतर प्रोसेस टू कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे.
मग यूपीआय पिन टाका आणि IRCTC पासवर्डसह कॅप्चा कोड एंटर करावा लागेल. एवढे झाले की मग Submit हा पर्याय प्रेस करायचा आहे. ही सर्व प्रोसेस तुम्ही योग्यरीत्या पूर्ण केली की मग तुमचं तिकीट बुक होणार आहे. या पद्धतीने तुम्ही गुगल पे चा वापर करून आता ट्रेनचे तिकीट बुक करू शकणार आहात. यामुळे गुगल पे वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.