Indian Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. विशेषतः 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाचे अपडेट राहणार आहे. जर तुम्हीही या कालावधीत रेल्वेने प्रवास करून इच्छित असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
मिळालेल्या माहितीनुसार सहा ते दहा सप्टेंबर दरम्यान देशभरातील 300 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून सुटणाऱ्या आणि दिल्लीत येणाऱ्या 300 हून अधिक एक्सप्रेस गाड्या या कालावधीत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडू शकते असे सांगितले जात आहे. यंदाची जी 20 शिखर परिषद भारतात आयोजित करण्यात आली आहे. या शिखर परिषदेमध्ये विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही परिषद राजधानी दिल्लीत 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत 300 एक्सप्रेस गाड्यांपैकी काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही एक्स्प्रेस गाड्या इतर मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
भारतीय रेल्वेने याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेनुसार या कालावधीत 300 हून अधिक गाड्या प्रभावित होणार आहेत आणि 200 हून अधिक गाड्या या कालावधीत रद्द राहणार आहेत.
भारतीय रेल्वेने G 20 शिखर परिषदेचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले असून या कालावधीत रेल्वे प्रवाशांनी रद्द केलेल्या गाड्यांचे शेड्युल पाहून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे महत्वाचे आवाहन यावेळी केले आहे. उत्तर रेल्वेने या संदर्भात ट्विटरवर फोटो पोस्ट करून रद्द केलेल्या गाड्यांची आणि ड्रायव्हरजन करण्यात आलेल्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
https://twitter.com/RailwayNorthern/status/1698010799078535348?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1698010799078535348%7Ctwgr%5E4feeab51735f2e37f89784f5463467f293680150%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F