Indian Railway Facts :- भारतीय रेल्वे विभाग किंवा भारतीय रेल्वे ही जगाचा विचार केला तर सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था असून सगळ्यात जास्त कर्मचारी असलेला रेल्वे विभाग आहे. भारताचे उत्तरेकडील टोक जम्मू ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी पर्यंत रेल्वेचे जाळे असून पूर्व ते पश्चिम पर्यंत देखील रेल्वेचे जाळे भारतामध्ये विकसित करण्यात आलेले आहे.
भल्या मोठ्या या रेल्वेचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाचे अनेक उपविभाग करण्यात आलेले आहेत. त्यातीलच मध्य रेल्वे हा विभाग खूप महत्त्वाचा आहे याच मध्य रेल्वे विभागांमध्ये असे एक रेल्वे आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे त्याचे अंतर फक्त तीन किलोमीटरचे आहे.
त्या ठिकाणी लोक ट्रेनने प्रवास करतात व हे अंतर नागपूर ते अजनी या स्टेशन दरम्यान आहे. तुम्हाला नागपूर वरून अजनीला जायचे असेल किंवा अजनी वरून नागपूरला यायचे असेल तर फक्त प्रवासासाठी नऊ मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु या नऊ मिनिटांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्याचा विचार केला तर तुमचे डोळे विस्फारतील इतके भाडे आकारले जाते.
तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी लागते ११४५ रुपये भाडे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर ते अजनी या दोन स्टेशन दरम्यान चे अंतर फक्त तीन किलोमीटर आहे परंतु या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर तुम्हाला अकराशे 45 रुपये भाडे मोजावे लागते.
याबाबतीत जर तुम्ही ऑनलाईन पोर्टल चा विचार केला तर नागपूर ते अजनी या दरम्यानचे सामान्य वर्गाच्या बोगीचे तिकीट साठ रुपये आहे व स्लीपर क्लास 175 रुपये तसेच थर्ड एसी बोगीचे तिकीट पाचशे रुपये व सेकंड एसी क्लासचे तिकीट 750 रुपये तर फर्स्ट क्लासचे भाडे चक्क ११४५ रुपये आहे.
तरीदेखील भारतातील हे सर्वात लोकप्रिय ठिकाण असून नागपूर ते अजनी दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर दररोज 1000 पेक्षा अधिक प्रवासी ट्रेनने प्रवासाला पसंती देतात. दर दिवशी हजारो प्रवासी अजनी ते नागपूर रेल्वे मार्गावर प्रवास करत असतात. विशेष म्हणजे या छोट्याशा अंतरासाठी जवळजवळ 13 आयआरसीटीसी गाड्या दररोज धावतात.