गुड न्यूज ! देशातील ‘हा’ 594 किलोमीटर लांबीचा महामार्ग 2025 मध्ये होणार पूर्ण, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India New Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असं सांगितलं जातं की, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे की, विकसनशील भारताला विकसित बनवण्यासाठी देशातील दळणवळण व्यवस्था सुधारली जात आहे.

या पार्श्वभूमीवर देशात विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आपल्या राज्यात देखील विविध महामार्गाची कामे सध्या स्थितीला सुरू आहे. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहररांना जोडणारा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.

या मार्गाचे आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 700 km एवढी आहे. यापैकी नागपूर ते भरवीर पर्यंतचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 100 किलोमीटरचे काम आता येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, हा मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे बांधून तयार होईल आणि त्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. एकंदरीत संपूर्ण समृद्धी महामार्गावर नवीन वर्षात वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरचा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आपल्या महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश मध्ये देखील विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश मध्ये गंगा एक्सप्रेस वे तयार केला जात आहे. दरम्यान, या गंगा एक्सप्रेस वे संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगा एक्सप्रेस वे प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वीच सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे.

मेरठ ते प्रयागराज या दरम्यान हा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या एक्सप्रेस वे ची एकूण लांबी 594 किलोमीटर एवढी आहे. या महामार्ग अंतर्गत 18 फ्लायओव्हर आणि 8 रोड ओवर ब्रिज विकसित होणार आहेत. त्यामुळे मेरठ ते प्रयागराज हा प्रवास गतिमान होणार आहे. या एक्सप्रेस वे चे काम 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते.

सध्या स्थितीला या महामार्गाचे 22 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे. या मार्गाचे संपूर्ण काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल अशी ग्वाही संबंधितांच्या माध्यमातून दिली जात आहे. खरंतर प्रयागराज येथे 2025 मध्ये कुंभमेळा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा महामार्ग कुंभमेळ्यापूर्वी नागरिकांसाठी सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे.

या मार्गाचे एकूण 12 पॅकेज मध्ये आणि चार टप्प्यात काम केले जात आहे. सध्या स्थितीला 22 टक्के काम झाले आहे म्हणजेच अजूनही जवळपास 80 टक्के काम बाकी आहे. मात्र आगामी प्रयागराज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे लवकरात लवकर काम केले जाईल असे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा