Improved Varieties Of Mustard : रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या मोहरीची लागवड करा, लाखों कमवा, विशेषता जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Improved Varieties Of Mustard : सध्या संपूर्ण देशात खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव (Farmer) गहू, हरभरा, मका, ज्वारी, जवस इत्यादी पिकांची शेती करत असतात.

शेतकरी बांधव मोहरीची (Mustard Crop) देखील मोठ्या प्रमाणात शेती रब्बी हंगामात करत असतात. मोहरी हे रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. हे एक तेलबिया पीक आहे, ज्याला मर्यादित सिंचन आवश्यक असते.

या कारणास्तव, देशातील शेतकरी बांधव मोहरीची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. जाणकार लोकांच्या मते रब्बी हंगामात मोहरीची लागवड (Mustard Farming) निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना मोहरीच्या सुधारित जातींची (Mustard Variety) पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या मोहरीच्या काही जाती जाणून घेणार आहोत.

पुसा मोहरी RH 30 :- मोहरीची ही जात हरियाणा, पंजाब, पश्चिम राजस्थान येथील शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या जातीचे पीक चांगले पक्व होऊन सुमारे 130 ते 135 दिवसांत तयार होते. जर तुम्हाला तुमच्या शेतात पुसा मोहरी आरएच 30 पेरायची असेल तर 15 ते 20 ऑक्टोबरपासून पेरणी सुरू करावी.

राज विजय मोहरी-2 :- मोहरीची ही जात 120-130 दिवसांत तयार होते. राज विजय मोहरी-2 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. या पिकापासून शेतकऱ्यांना हेक्टरी 20-25 क्विंटल उत्पादन मिळू शकते. त्यात तेलाचे प्रमाण 37 ते 40 टक्के असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पुसा मोहरी 27 :- पुसा मोहरी 27 ही जात भारतीय कृषी संशोधन केंद्र, पुसा, दिल्ली येथे तयार करण्यात आली आहे. या जातीचे पीक शेतात 125-140 दिवसात तयार होते आणि त्याची उत्पादन क्षमता 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

पुसा बोल्ड :- ही जात देशातील अनेक राज्यांमध्ये घेतली जाते, परंतु राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी पुसा बोल्ड जातीची मोहरी अधिक पेरतात. त्यातील तेलाचे प्रमाण पाहिल्यास त्याच्या पिकातून 42 टक्के तेल मिळू शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment