Pune Railway News : भारतात रेल्वे हे एक प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. रेल्वे प्रवास हा बस आणि इतर पर्यायी प्रवासापेक्षा स्वस्त आहे. शिवाय आपल्या देशात रेल्वेचे नेटवर्क हे खूप मोठे बनले आहे. देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे.
देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचा असेल तर रेल्वे उपलब्ध आहे. हेच कारण आहे की, रेल्वेच्या प्रवासाला नेहमीच पसंती दाखवली जाते. सर्वसामान्य प्रवाशांमध्ये रेल्वेचा प्रवास विशेष लोकप्रिय आहे. सणासुदीच्या काळात तर रेल्वेत मोठी गर्दी होत असते.
दरवर्षीप्रमाणे या दिवाळीतही रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वेकडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. यात पुण्यात स्थायिक झालेल्या विदर्भवासियांसाठी आणि खानदेशमधील जनतेसाठी सुद्धा एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुणे ते अमरावती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे रेल्वेने जाहीर केले होते. खरंतर पुण्यामध्ये खानदेशी मधील आणि अमरावती सह विदर्भातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. दरम्यान नागरिकांना दिवाळीच्या काळात गावाकडे जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून 10 नोव्हेंबर ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुणे ते अमरावती विशेष गाडी चालवली जाणार होती.
यामुळे पुणे ते अमरावती हा प्रवास जलद आणि गतिमान होणार होता. अमरावतीसहित संपूर्ण विदर्भातील आणि खानदेश मधील रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळेल असा आशावादही व्यक्त केला जात होता. मात्र ही गाडी काही तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे प्रवाशांचा मोठा हिरमोड झाला आहे. अचानक ही गाडी रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. खरतर, या विशेष एक्सप्रेस गाडीच्या एकूण 186 फेऱ्या चालवल्या जाणार होत्या.
पण आता या संपूर्ण फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे-अमरावती विशेष एक्सप्रेस ट्रेन उरळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार होती.
त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार होता. पण आता ही गाडी रद्द झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीच्या काळात फटका बसणार असून आता त्यांना इतर पर्यायी मार्गाने गावाकडचा प्रवास करावा लागणार आहे.