Buffalo Rearing : भारतातील ग्रामीण भागात शेती हा उपजीविकेचा एक मुख्य स्रोत आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांचा शेती एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीला भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेती व शेतीवर आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. देशातील ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिक शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. शेतीशी संबंधित व्यवसाय असल्याने पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
पशुपालन हा व्यवसाय प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. या व्यवसायातून फक्त दुधाचे उत्पादन मिळते असे नाही तर दुधासोबतच शेणखत आणि गोबर गॅसचे देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन मिळते. परिणामी या व्यवसायातुन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
देशभरातील पशुपालक शेतकरी गाईंचे आणि म्हशींचे मोठ्या प्रमाणात संगोपन करत आहेत. तथापि या व्यवसायातून चांगली कमाई जर करायची असेल तर गाई किंवा म्हशीच्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे.
यामुळे आज आपण म्हशीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या म्हशीच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत ती म्हैस एका वेतात तब्बल पाचशे लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे म्हशीची ही एक देशी जात आहे.
या जातीच्या म्हशीचे संगोपन बनवणार मालामाल
आम्ही ज्या म्हशीच्या जातीबाबत बोलत आहोत ती म्हैस आहे टोडा. ही म्हशीची एक प्रमुख जात आहे. ही जात प्रामुख्याने तमिळनाडू तेल निलगिरी भागात आढळते. अस सांगितलं जात की, आधी टोडा जमातीचे लोक या जातीचे संगोपन करत असत. हेच कारण आहे की या जातीच्या म्हशीला टोडा हे नाव पडले आहे. म्हशीच्या या जातीचे संगोपन उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते. ही जात दुग्धोत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. म्हशीची ही जात एका वेतात 500 लिटर एवढे दूध देते. जर या म्हशीला चांगला आहार दिला आणि योग्य व्यवस्थापन केले तर या जातीपासून चांगले दूध उत्पादन मिळवले जाऊ शकते.
टोडा म्हशीच्या विशेषता
तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, या जातीच्या म्हशींचे कपाळ रुंद, डोके जड व मोठे असते. या म्हशीचे शिंगे लांब असतात. या म्हशीचे पाय बऱ्यापैकी मजबूत असतात. त्याची शेपटी लहान असते. या म्हशीचे वजन 380 ते 400 किलो पर्यंत असते. म्हशीच्या संपूर्ण शरीरावर दाट केस असतात. विशेषतः मानेच्या वरच्या भागावरील केस हे अधिक दाट पाहायला मिळतात. या जातीच्या म्हशीची एका वेतात ५०० लिटर दूध देण्याची क्षमता आहे.