IMD Alert : कालपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांशी भागात काल ढगाळ हवामान पाहायला मिळाले तर काही ठिकाणी पावसाची देखील नोंद काल झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात तसेच राज्यात इतरही भागात काल पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने तसा अंदाज देखील वर्तवला होता.
सोबतच परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील चार मार्च ते 10 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 4 मार्चपासून ते आठ मार्च पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या मते पश्चिमे चक्र वाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तरेकडून वारे राज्यात येत आहेत. म्हणजेच उत्तर भारताकडून राज्याच्या दिशेने वारे वाहत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता तयार होत आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, विदर्भ, खानदेश, औरंगाबाद, जालना, हिंगोली या जिल्ह्यात एवढे दिवस पाऊस पडणार अन गारपीट…!
भारतीय हवामान विभागाच्या मते अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, चाळीसगाव तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित जिल्ह्यातही आठ मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल आणि 08 मार्चपर्यंत या वर नमूद केलेल्या भागात जवळपास 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर राज्यातील काही भागात सात मार्चच्या आसपास गारपिटीची शक्यता देखील हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. निश्चितच गारपीटीमुळे तसेच वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे देखील रब्बी हंगामातील पिकांची मोठी हानी होणार आहे. सोबतच द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या फळ पिकांना देखील याचा फटका बसणार आहे. एकंदरीत भारतीय हवामान विभागाचा अंदाज पाहता राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या विभागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
रविवार पासून मात्र थोडासा बदल होईल आणि कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह अण मेघगर्जनासहं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच मंगळवारी गारपीट देखील होईल असा अंदाज आहे. निश्चितच पावसाची अन गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचे तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कांदा उत्पादकांना क्विंटलमागे मिळणार ‘इतकं’ अनुदान; ‘या’ दिवशी जाहीर होणार अनुदान, वाचा सविस्तर