PM Kisan New Registration : केंद्र सरकारडून देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारकडून 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आल्या आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनेमधून 6 हजार रुपये दिले जात आहेत. सरकारकडून प्रत्येकी चार महिन्यांमध्ये सामान तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जात आहेत.
शेतीला चालना देण्यासाठी सरकारडून या योजनेतुन दरवर्षी 6 हजार रुपये दिले जात आहेत. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हीही या योजेनसाठी अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर घरबसल्या सहज करू शकता.
6 सोप्या स्टेप्समध्ये नोंदणी करा
पीएम किसान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाइटpmkisan.gov.in वर ‘फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करा.
नवीन नोंदणीवर क्लिक करा. आधार आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि राज्य निवडा.
आलेला ओटीपी भर आणि नोंदणीसाठी पुढे जा’ हा पर्याय निवडा.
सर्व तपशील भरा.
मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका आणि शेतीशी संबंधित तपशील आणि कागदपत्रे अपलोड करा.
पीएम किसान योजनेची पात्रता काय आहे?
पीएम किसान योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक शेतकरीच घेऊ शकतात.
पीएम किसान योजना गरजू आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
शेतीच्या कामात गुंतलेल्या कुटुंबांव्यतिरिक्त, वैयक्तिक शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही वयोमर्यादा नाही.